आज १६३ रुग्णांची वाढ; कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३८१९ वर

Foto

*जिल्ह्यात २०६ मृत्यू; १५६७ रुग्णांवर उपचार सुरू, 


 औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी १६३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ३८१९ वर जाऊन पोहचली आहे. तर एका रुग्णाचा तर घाटी रुग्णालयात ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात २०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १६३ रुग्ण नविन आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये ५५ स्त्री व १०८ पुरुष आहेत. त्यात शहरातील ११२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात शिवाजी नगर-४, सिडको एन चार, जय भवानी नगर-१, बौद्ध नगर, जवाहर कॉलनी -१, शिवशंकर कॉलनी -४, बायजीपुरा-१, हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर-१, सिडको -१, तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी -१, उत्तम नगर-१, समर्थ नगर -१, म्हाडा कॉलनी-१, अरिफ कॉलनी-१, कोटला कॉलनी-१, उस्मानपुरा -१, एन नऊ सिडको -३, अंबिका नगर-१, पडेगाव -१, भानुदास नगर-७, न्यू नंदनवन कॉलनी -१, विष्णू नगर -१, उल्का नगरी -१, पद्मपुरा-५, क्रांती नगर -१, नागेश्वरवाडी -२, नक्षत्रवाडी-१, एन पाच सिडको-२, एन सहा, मथुरा नगर-३, गजानन नगर -६, औरंगपुरा-१, जय भवानी नगर-८, एन सहा, संभाजी कॉलनी-१, नानक नगर-१, शिवनेरी कॉलनी, गारखेडा -१, म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ-१, एन सहा सिडको -२, सेवा नगर हाऊसिंग सोसायटी -१, राज हाइट, सेव्हन हिल जवळ-१, जे सेक्टर, मुकुंदवाडी-१, भगतसिंग नगर -३, विठ्ठल नगर, मुकुंदवाडी-१, कॅनॉट प्लेस -१, न्यू विशाल नगर-१, श्री साईयोग हाऊसिंग सोसायटी -१, राजेसंभाजी कॉलनी, जाधववाडी -१, मुकुंदवाडी -२, मयूर नगर -१, आयोध्या नगर-२, बौद्धवाडा चिकलठाणा -१, चिकलठाणा हनुमान चौक-२, सुरेवाडी-१, विजय नगर -२, गारखेडा परिसर-१, रशीदपुरा -१, सिडको महानगर दोन, वाळूज-४, जय गजानन नगर -१, इतर-१, कैलास नगर-१, एन दोन सिडको -३, जोहरीवाडा, गुलमंडी-१, राजेसंभाजी नगर-१, बन्सीलाल नगर -१, रमा नगर-१, हनुमान नगर -२, सातारा परिसर-१, मयूर पार्क-१, या भागातील कोरोनाबाधित आहेत.
ग्रामीण भागातही आढळले ५१ रुग्ण 
आज आलेल्या अहवालानुसार १६३ रुग्णांमध्ये ५१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यात मांडकी-२, सिद्धीविनायक हाऊसिंग सोसायटीजवळ, बजाज नगर -२, राजतिलक हाऊसिंग सोसायटी बजाज नगर -५, ओयासिस चौक, पंढरपूर-१, ग्रोथ सेंटरजवळ, बजाज नगर-१, हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर -२, सारा गौरव, बजाज नगर -२, जय भवानी चौक, बजाज नगर-१, एन अकरा, मयूर नगर, हडको -२, पंचगंगा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर -१, दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर-१, संजीव हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर -१, बीएसएनएल गोदामाजवळ बजाज नगर -१, वडगाव-१, विराज हाईट, बजाज नगर-१, दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर-३, भाग्योदय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर-१, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर-१, करमाड -६, फत्तेह मैदान, फुलंब्री-१, विवेकानंद कॉलनी, फुलंब्री-१, कोलघर -२, गजगाव, गंगापूर-१, लासूर नाका,गंगापूर -१, लक्ष्मी कॉलनी, गंगापूर -१, शिवूर बंगला -२, कविटखेडा, वैजापूर-१, शिवूर -५, मधला पाडा, शिवूर, वैजापूर-१ या भागातील कोरोनाबाधित आहेत. 
खासगी रुग्णालयात एक तर घाटीत तीन कोरोनाबाधिताचा मृत्यू
औरंगाबादेतील गोररखेडागाव येथील ६६ वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचा आज (दि.२३) मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटाने एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर वंजारगाव येथील ६६ वर्षीय पुरुष, पीर बझार ८६ वर्षीय पुरुष, खामगाव फुलंब्री येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात २०६ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 
१५६७ रुग्णांवर उपचार सुरू
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार ३८१९ कोरोनाबाधित रुग्णापैकी २०४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर २०६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सध्या १५६७ रुग्ण उपचार घेत आहेत.